Friday, November 19, 2010

तुळशी विवाह

काल सकाळीच हापिसात असताना फोन आला.. आज तुळशीचं लग्न आहे.. लग्नाचं सामान घेउन या...
मग काय संध्याकाळी हापिसातुन जाताना सगळं सामान घेऊन स्वारी घरी पोहचली...
बायकोने सुंदर रांगोळी आधीच काढुन ठेवलेली होती.


  स्वारीने पोहचुन मग बाकीची मांडणी केली...


 सगळ्या बिल्डिंगला आमंत्रण गेली आणि ९.३० च्या मुहुर्तावर तुळशीचे लग्न लावले गेले..


बाकिचे फोटु ईथे पहाता येतील..

TulsiVivah

4 comments:

Suhas Diwakar Zele said...

वाह सही..!!

Deepak Parulekar said...

वा वा ! मला आठवतं. लहानपणी गावी असताना प्रत्येक घरासमोरच्या तुळशीचं लग्न लावलं जाई. आणि नेहमी मीच नवरा व्हायचा हट्ट करायचो ! :)

Yuvraj Mohite said...

आम्ही याच वर्षी मुंबईत लक्ष्मी पूजन केले आगोदर गावी करायचो.
तुळशी विवाह सुद्धा.

आता मुंबईत आल्यानंतर हे पहिलेच लक्ष्मी पूजन.
त्या मुळे खूप इच्छा होती तुळशी विवाह लावायची पण काही कारणा मुळे जमले नाही.
पण तू लावलेला तुळशी विवाह पाहून खूप आनंद झाला.
असे वाटले की माझीच इच्छा पूर्ण झाली.

धन्यवाद
आनंद

Anand Kale said...

धन्यवाद सुहास...

अरे मुंबईला मी पुर्ण आमच्या मंडळातली तुळशीची लग्न लावायचा आणि त्यावर दक्षिणा मागायचो..;)

धन्यवाद युवराज.. तुझी ईच्छा पुर्ण झाली यातच सगळं आले..