६ फुट उंची, धिप्पाड शरीरयष्टी, कसलेलं शरीर, हातात काठी, भल्या मोठ्या डोक्यावर तेव्हढाच मोठा ला फेटा, अंगात पांढरा सदरा आणि धोतर, पायात चामड्याच्या चपला....
१९४२ साली गोदित काम करणारे..
गो-या साहेबाला जवळुन पाहीलेले...
१९४२ च्या मुंबई बॉंम्बस्फोटानंतर गावी येऊन शेती करु लागलेले..
मोठ्यांनी भारदस्त आवाजात बोलणारे आणि लहानांशी बोलताना स्वत: लहान होणारे..
वयाच्या ८५ वर्षी स्वत:च्या मोठ्या मुलाचा म्रृतदेह मांडिवर घेऊन ओक्साबोक्सी रडणारे...
गावी येणा-या प्रत्येकाची काळजी घेणारे, रात्री २ वाजता जरी गेलो तरी तेव्हा उठुन सगळ्यांच्या गरम पाण्याची, चहाची सोय करणारे...
बायकोचा गुढगे दुखतात म्हणुन तिच्या हाताशी राहुन तिला जेवणात मदत करणारे...
गावाचे गेनबाबा, वडाजवळचे बाबा..
माझे बाबा (आईचे वडील) शनिवारी आम्हाला सोडून गेले..
कोहेलो म्हणतो तसं.... एका विश्वाचा अंत झाला..
7 comments:
:( :(
भावपुर्ण श्रध्दांजली....
ओह्ह वाईट झाला रे.. :(
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो
गेलेलं माणूस कधी परत येत नाही पण त्यांच्या आठवणी कायम मनात रहातात. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो.
गेलेले बऱ्याच आठवणी देऊन जातात.....
ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो.
माझी ईच्छा राहुन गेली...
बाबांनी माझ्या बाळाला एकदा कवेत घ्याव ही..
त्यांच्या आत्म्याला शांती लाभो...
आनंद फोटो का नाही टाकलास रे त्यांचा?
वाईट वाटले वाचून आणि अजून खंत वाटली ती त्यांच्या पणतू/पणतीला त्यांनी जवळ घ्यावे ही तुझी ईच्छा अपुर्ण राहिल्याबद्दल.... :(
Post a Comment