Sunday, October 25, 2009

चाइनामेड वस्तूंवर बहिष्कार

मित्रांनो,

आपणा सर्वांना माहितच असेल की गेल्या काही आठवडयामध्ये चीनने कश्मीरमध्ये घुसखोरी सुरु केली आहे. काही प्रांतामध्ये ते आपले वर्चस्व प्रस्थापित करत आहेत.
आपल्या प्रधानमंत्रिची अरुणाचलप्रदेश भेटही त्यांना खटकते आहे आणि आपले सरकार काहीही करत नाही. एव्हढेच काय पण भारतीय नागरीकही डोळे बंद करून आपल्या पुरता जगतो आहे. 

भारतीय बाजारपेठ चाइनामेड वस्तूंनी खचाखच भरलेल्या आहेत. या वस्तुंचा दर्जा इतका खालावलेला आहे की त्या पाच्चिमात्य देशांमध्ये स्विकारल्या गेल्या नाहीत. पण आपण भारतीय मात्र "वापरा आणि फेकून दया" या चीनच्या तत्वांना बळी पडतो आहे. त्यात या वस्तु स्वस्तामध्ये मिळतात यामुळे  भारतीय परंपरा न तोडणारे आपण भारतीय ज्यांना "रस्ते का माल सस्ते में" हे वाक्य खुप आवडते असे सर्रास या वस्तूंवर तुटून पडतात.
माझ्या लोकलमधील एका मित्राने एक चाइनामेड भ्रमणध्वनी ज्यात सगळ्या सेवा आहेत अवघ्या ३५००/- घेतला. त्याचा कर्कश आवाज त्याला खुप आवडे. त्याला विचारले की "बाबा हा संच किती दिवस टिकणार??" तर म्हणे "३५००/- मध्ये अझून काय काय हवे आहे. चालेल तेव्हढा चालेल". 

माझ्या हिशेबी आपण खालील महत्वाच्या गोष्टी विसरतो आहोत.
१. चीनचे वारंवार भारताला ग्राह्य धरणे आणि त्यांचे छुपे आक्रमण. 
२. सर्वश्रुत भारतीय बाजारपेठेवर आक्रमण .
३. स्वस्त पण निकृष्ट दर्जाच्या वस्तु भारतीय बाजारात विकने. जसे कर्कश आवाजाचे भ्रमणध्वनि, त्यात वापरण्यात आले निकृष्ट दर्जाचे प्लास्टिक इ.
४. या वस्तु बनवताना लागलेला कच्चा माल हा बहुतेक वेळा घातक असतो ज्याने कर्करोग होण्याचे धोके असतात.
५. या वस्तु खराब झाल्यावर त्या कचारयात फेकण्यात येतात ज्याने भारताच्या पर्यावरणावर होणारे परिणाम. 
६. भारतीयांनी अवलंबलेली "वापरा आणि फेकून दया" प्रवृत्ति त्यामुळे कमी वेळ चालनारया आणि विघटन न होणारया या घातक वस्तुंचा होणारा साठा.
७. अश्या निकृष्ट वस्तु विकत घेउन आपण चीनला एक प्रकारे आपल्यावर आक्रमणास मदतच करत आहोत. (भारतीय बाजारपेठ आणि भारतीय सीमा या दोन्हीवर )

याला आवर घालण्यासाठी आपणच जागृत झाले पाहिजे. यावर आपल्या हाती असलेला उपाय म्हणजे अश्या वस्तूंवर बहिष्कार आणि इतरांना अश्या वस्तु घेण्यापासून परावृत्त करणे.
अश्या वस्तु कितीही स्वस्त, आकर्षक असल्या तरी मनाला आवर घालून अश्या वस्तु न घेणे. ही माहिती आपल्या मित्र-मंडळीन्ना कळवा.

यावरील आपली प्रतिक्रिया माझ्या अनुदिनीवर (http://tavalaki.blogspot.com) दया जेणेकरून इतरांची मतेही आपणास कळतील.  

कळावे,
आनंद काळे

सुखं वा यदि दुःखं, प्रियं वा यदि अप्रियं
प्राप्तं प्राप्तं उपासिते. हृदयेन अपरजितः

http://labs.google.co.in/smschannels/subscribe/AnandKshan
http://groups.google.com/group/anandkshan
http://tavalaki.blogspot.com

2 comments:

Narendra prabhu said...

‘Made In Chaina’ असा शिक्का असलेल्या असंख्य वस्तू. खेळणी संपूर्ण भारतात रस्तो-रस्ती, गल्लो-गल्ली आपणाला पहायला मिळतात. विशेष दर्जा नसलेली ही उत्पादनं आपण कमी किंमत आहे म्हणून विकत घेतो. हरामखोर चीन्यांना धडा शिकवायचा असेल तर चीनी मालावर बहिष्कार घालणे हा एक उपाय होवू शकतो. चीनचा निषेध करायची ती एक परिणामकारक खेळी ठरेल.

Anonymous said...

चीनविरुद्ध पावले उचलण्याने भारताचे सार्वभौमत्व सिद्घ होईल असे मला वाटत नाही. जाणून बुजून चिखलात पाय रुतवण्याचा तो उद्योग ठरेल. चीनची तीच अपेक्षा असावी.