डोळे बंद केले तर काहीतरी समोर दिसू लागते. वाटत एका उंच काड्यावर मी उभा आहे आणि मला कुणीतरी त्या कड्यावरुन खाली टाकत आहे आणि मी दचकतो. कधी कुणी सिगरेटचा चटका देतोय असा भास होतो कधी बिछान्यावरून मी खाली पडतोय असा वाटत. झोपेत असच बराच काही डोक्यात चालत आणि मध्येच मला दचकायला होत. पण या दचकण्याने काल एक विनोदी प्रसंग घडला.
काल ऑफीस दुपारपर्यंत चालू होत. माझ काम आटोपल आणि मी घरी जायला निघालो. दुपारी ३ वाजता वी टी स्टेशन ला पोहचलो. ठाणे लोकल मिळाली आणि खिडकीची जागा पकडून बसलो. मुंबईच्या लोकलमद्ये ज्याला खिडकीजवळची जागा मिळाली त्यालाच माहीत त्याने काय कमावले ते. लोकल मधे तशी गर्दी कमीच होती. लोकल सुरू झाली आणि गार वारा अंगाशी खेळू लागला. भायखळा स्टेशन गेले आणि मला मस्त पैकी झोप लागली.
मी मस्त पैकी डुलक्या घेत होतो आणि पुन्हा तेच सुरू झाले. मला भास होऊ लागला की कुणीतरी मला सिगरेटने बोटांना चटके देत आहे. मी जोरात दचकलो आणि हाताची बोटे पाहु लागलो. समोर नजर गेली आणि पाहतो तर बाजूचे सगळेच माझ्या दचकण्याने चांगलेच हादरले होते. एक तर घाबरून मला विचारात होता "काय झाल म्हणून?". मी मात्र काय झाले ते आठवून आणि त्यांच्या चेह-याकडे पाहून गालातल्या गालात हसत होतो.
- टवाळ
1 comment:
ccccccccccchhhhhhhhhhhhaaaaaaaaaaaannnnnnnnn.
Post a Comment