Tuesday, January 5, 2010

जनता खाना


बाहेरच खाणे खराबच असते (जे बऱ्याच अंशी खरच आहे) असे माझ्या घरचे लहानपणापासून मला सांगत आले आहेत त्यामुळे शाळेत असल्यापासून डब्बा घेउन जायची मला जी सवयच लागली आहे ती अझून सुटली नाहीच.
पण त्यादिवशी बायकोला बर नव्हत त्यामुळे सकाळचा डब्बा काही बनला नाही. सकाळचा
नाष्टा पण झाला नाही. फ़क्त चहा पिउन निघालो. मला बुआ सकाळी मस्त पैकी भूक लागते. त्यामुळे काहीतरी खाणे भागच होत. म्हंटल आज बाहेरच नाष्टा करू.
लोकलमध्ये मित्रांच्या गँगमध्ये कळले की सी एस टी स्टेशनजवळ एक साधे होटल आहे तिथे नाष्टयाची सोय होइल. स्टेशनला उतरलो आणि बाहेरगावच्या गाड्या जिथून सुटतात तिथे एक मस्त होटल आहे रे-फ्रेश म्हणून आमची सवारी मग तिकडे वळली. ब-या पैकी स्वच्छता बघून जिव नाष्ट्यात पडला. मेनुवर एक नजर फिरवली आणि नेहमीच्या ओळखिचेच पदार्थ दिसले. त्यातल्यात्यात एक नविन पदार्थ दिसला "जनता खाना" . म्हटला चला नविन काहीतरी ट्राय करू (या अश्याच वागण्याने पोटाची वाट लागलीय पण ऐकते ती सवय काय )
आर्डर दिली. १० रु.मध्ये बटयाटयाची भाजी , ७ पु-या, हिरवी मिर्ची, लोणच्याचे एक छोटे पाकिट यांनी भरलेली एक प्लेट समोर आली. वा! हे सर्व बघून तर भूक अजुनच वाढली तरीही स्टेशनवरचे खाणे म्हणून भीत भितच सुरुवात केली. चव ब-यापैकी चांगली होती आणि मुख्य म्हणजे स्वच्छता. आवडले..ख-या अर्थी जनता खाना होते ते.
इतक्या उशिरा याबद्दल लिहिले कारण खाऊन पोट ख़राब नाही झाले म्हणजे कमावले या अर्थी खरच ते खाणे चांगले होते हे सांगायचे होते. एकदा तुम्हीही ट्राय करून पहा जमले तर .. ;-)

-- आनंद काळे

2 comments:

Anonymous said...

मस्त ब्लॉग आहे मित्रा.. जव्हारचे फोटो सही आहेत. मी सुद्धा जव्हार वर एक पोस्ट टाकली आहे...
"मला बुआ सकाळी मस्त पैकी भूक लागते" - same here :)
रे-फ्रेश मधे जाउन बघाव लागेल..

Anonymous said...

खूप दिवसांपासून वाचतोय या जनता खानाबद्दल स्टेशन्सवर... आता खाऊन बघेन!