Thursday, August 11, 2011

वृदधाश्रमातल्या काही वल्ली

मेच्या महिण्यामध्ये तळोजाच्या एका वृद्धाश्रमाला भेट देण्याचा योग आला.
पुरुषांच्या एका खोलीत आम्ही शिरलो. खोलीतल्या नजरा आमच्याकडे वळल्या. काय भाव होते त्यांच्या चेह-यावर हे चेह-यावरील सुरकुत्यांमुळे कळुन येत नव्हते. आम्ही त्यांना नमस्कार करून त्यांची विचारपुस करू लागलो. दरवाजा समोरील एका बेडवर एक गृहस्थ होते.
नाव जोशी. गोरा वर्ण, हाफ खाकी पॅंट, डोळ्यावर जाड भिंगाचा चश्मा. अस्सलखित मराठीत त्यांच बोलणं सुरु. अस्सल भटुरडे म्हणावं असं व्यक्तिमत्व. त्यांनी आवर्जुन फोटो काढायला सांगितला आणि त्याची एक प्रत मिळावी अशी त्यांची ईच्छा होती. खुप मजा आली त्यांच्याशी बोलताना.
खोलीभर नजर फिरवताना कोप-यातले एक आजोबा मला बोलवताना मी पाहीलं. त्यांच्याकडे गेलो आणि तबियत कशी आहे याची विचारपुस केली. त्यांच नाव मगनभाइ.
"एक फोन लगाके दोगे?"
मी खिश्यातून फोन काढला. त्यांनी लगेच नंबर सांगितला. फोन लावून त्यांना दिला. त्यांच संभाषण गुजराथी मध्ये सुरु होतं. समोरच्याची खुशाली विचारत होते ईतकं कळलं. संभाषण संपलं.
"मेरे शेटको फोन लगाया था. उसका बेटा था फोनपर. उसका लडका अब बडा हो गया है."
"आपके घर फोन करना है"
"मेरा घर नही है. जबसे बंबई आया हूं तबसे शेटने मेरे हो संभाला. बुढा हो गया तो मेरा खयाल रखने के लिए मेरे को यहा भेजा. मेरा शेट बहुत भला आदमी था. उसके परीवारकोही मैं अपना परीवार मानता हू"
मनाला लागणारं हे असं एक व्यक्तीमत्व.
मी मगनभाईशी बोलत असताना बाकीच्यांनी एका आजोबांना गराडा घातला होता. नाव रंगनाथ शेळके.
आंबेडकरांना देव माननारे असे हे रंगराव. कविता, शायरी करण्याचा, वाचण्याचा, बोलण्याचा एक त्यांचा आवडीचा छंद. ते कविता शेर ऎकवत होते आणि आमच्यातला एक ते लिहून घेत होता. त्यांच्या कविता ईटरनेटवर टाकू म्हणजे सारं जग त्यांच्या कविता वाचू शकेल असे सांगीतल्यावर प्रचंड खुष झाले. 
ही पोस्ट खर तर त्यांच्या कविता,शेर ईथे टाकण्यासाठीच टंकत आहे. काही शेर त्यांनी ऎकलेले आणि आम्हाला ऎकवलेले असू शकतात. च.भु.द्या.घ्या..

त्यांचे काही शेर..*..

किसीकी याद मेरे आस पास रहती है
बहुत दिनोंसे तबियत उदास रहती है
बिछड गये मगर दिल मानत नही
क्यों उसे मिलने की आस रहती है


मौत सबकी मंजिल है
जिंदगी एक सफर है
मत तोडना किसीका दिल
हर दिल खुदाका घर है

आशिक कभी मरते नहीं
जिंदा दफनाए जातें है
जब भी कबर खोल के देखो
ईंतजार मे पाए जाते है

रास्ता भर रोडोंसे
हमसे पुछा पाओंकी छालो ने
बस्ती कितनी बसाली
दिलमें बसाने वालोंने

ये न थी हमारी किस्मत
के विशालें यार होता
और जिंदा रहते तो
यही इंतजार होता
-----------
हिंदी कविता
 
किसीको अपना बनानेसे क्या फायदा

अब किसीका किसीको भरोसा नही
मेरे पहलु उठकर चले भी गए
वादा-ए-वापसी का भरोसा नही

देखो टकरा रही है नजरॊसे नजर
वो न आए न आयी खुशियोंकी घडी
जानेवाली खुषी तो चली भी गई
आनेवाली खुषी का भरोसा नही

फैसला साथ रहनेंका करलो अभी
आजका काम कलपर ना डालॊ कभी
जिंदगी कल रहे ना रहे क्या खबर
जानेमन जिंदगीका कुछभी भरोसा नही
--------------------------------------------------

मराठी कविता


हा कलीयुगाचा फेरा
कसा वाहे उलटा वारा
ना सत्याला थारा देवा
असा कसा दरबारी न्याय तुझा न्यारा?

सांगे कोणी भोळ्या जनतेला मी देशभक्त मोठा
मारुनी थापा सा-या कमवी सा-या नोटा
नसे देशभक्ती त्यांची होई बोजवारा
असा कसा दरबारी न्याय तुझा न्यारा?

ठाई ठाई अन्याय अत्याचारा तो उत येई सारा
पाहुनी कोणी दुबळ्या अबलेवर करती बलात्कार न्यारा
मग सांग देवा तुच आता देईल कोण निवारा??
असा कसा दरबारी न्याय तुझा न्यारा?

सत्य अहिंसेचे सारे गोडवेच गाती
पण वरकरणी पाहूनी फुक न्याय करती
पुसे शेळके दादा कुठवर चालेल हा नंगानाच सारा
असा कसा दरबारी न्याय तुझा न्यारा?

-रंगनाथ शेळके


1 comment:

सौरभ said...

वाह वाह... भारीच...