Friday, May 20, 2011

ब्रॅंडस- माझ्यासाठी एक भुलभुलैया

"ही ऑफर पाहिलीस का?? रीबॉकच २५०० च घड्याळ आणि रीबॉकचा ४००० चा गॉगल फक्त १५०० रुपयात आणि तेही ईस्टॉलमेंटमध्ये.."-ईती बायको..
"हम्म्म.. आहे छान.. पण खरंच वर्थ आहे का?"
"मी ऑर्डर करते आहे. मला हवा आहे"
"बरं, जसं तुला योग्य वाटेल"
दिल्लीवरून सात दिवसांनी येणार म्हणून वाट पाहिली.. डिलीवरी झाली १२ दिवसांनी... दोन्ही गोष्टी चाचपून पाहिल्या.. घड्याळाच्या पट्ट्यावर कंपनीचा छाप होता. मागच्या बाजूलाही रीबॉक छापलेलं.. वॉरंटी कार्डही होतं सोबत..गॉगल भावाला आवडला..त्या सोबतची केसही छान होती..
घड्याळ मी घालून पाहिलं ..छान आहे तसं ...
सोमवारी घड्याळ हातात घातलं सगळ्यांना दिसेल .. ट्रेनमध्ये एक पिचकलाच.. १०० रु घेतलं का रे...
तोंडात सकाळी सकाळी वाईट शब्द नकोत म्हणून आवरलं.. आणि नीट समजवून सांगितलं..
परवा सिएसटीवरून घरी येत होतो...एक विक्रेता ओरडत होता.. " रिबॉक का घडी लेलो १०० रु मे..."
मी थबकलोच...घड्याळ नीट पाहिलं सेम टू सेम... तसाच कंपनीचा लोगो होता आणि तसाच कंपनीचा छाप असलेला पट्टा.. म्हटलं चांगलाच फसलो म्हणजे... मित्राला विचारलं तर म्हणाला अरे हे कस्टम मधून चोरुन काढलेले असतात.. तुला आलाय तो रीटेलरकडून...तरी मन खट्टू झालं ते झालंच.. 

लहानपणापासून ते लग्नापर्यंत मी माझे कपडे शिवूनच घेत होतो.. थोडा क्लासिक लुकच असायचा माझा..तसा आत्ताही मी बदललेलो नाही..पण मला फिकीर नसायची.. लग्नानंतर खरेदी वाढली.. बायको ब्रॅंडस ला अझुनही प्रेफरेंस देते..पण मोजके रेडीमेड शर्टस सोडून ईतर मला कंफरटेबल वाटले नाही.. त्यात त्यांच्या फिटींगचा प्रोब्लेम.. आणखी एक म्हणजे आईच्या धुलाईपुढे अश्या कपड्यांच्या बटणांचा निभाव लागत नाही... ईतकं असलं तरी बायकॊ काही ब्रॅंडस सोडत नाही...त्यात १०००-४००० ची शर्टस पाहून माझ्या तोंडाला फेस येऊ लागतो..मला अजून समजत नाही की हिच शर्टस समर ऑफरमध्ये ४००-५०० ला विकायला कशी कंपण्यांना परवडतात.. म्हणजे ईतर दिवशी ते विकतात तेव्हा यांचा प्रोफीट मार्जिन तरी किती असतो... माझ्या मेव्हण्याने दोन दिवसापुर्वी टॉमी हिलफिगरची ४००० किंमत असलेली शर्टस अवघ्या ५०० रुपयाला आणली (दुकानदार, होलसेलर, मित्र, ओळख).. म्हणजे सामान्य लोकांची किति लुटालुट चालली आहे.. एकच जमेची बाजू म्हणजे अश्या कपड्यांच्या शेडस खूप छान असतात ..

एकदा म्हटलं चांगले शुज घेऊ.. मित्रांच्या बोलण्याला भुलून पहील्यांदा बाटा सोडून ली कुपरचे १८०० चे शुज घेतले.. माहीत आहे ही स्टार्टींग रेंज वाले आहेत..पण बाटाचे ७००-८०० रु. चे बुट (हो बाटाची बुटंच..आणि बाकीचे शुज) वापरणा-याची पहीली उडी ईतकीच..
शुज तसे सोफ्ट आणि कंफर्टेबल होते (हो होते..त्यांनी प्राण सोडलेला आहे). पण सहा महीण्यातच या शुजची शिलाई उसवली... दुकानाच्या पावतीवर ३ महीण्याची वॉरंटी होती..ते रिप्लेस,रिपेअर होणार नाहीत.. जिथे बाटाचे बुट मी २-३ वर्षे चांगल्या स्थितीत वापरले आहे तिथे हे महागडे शुज ६ महीण्यातच धारातिर्थी पडले...माझ्या सारख्याला हा पहीलाच धक्का जोरात बसला... सध्या गाडी पुन्हा जुण्या बाटाच्या बुटांकडे वळली आहे...

ईतके पैसे मोजूनही जर अश्या वस्तू वायाच जात असतील किंवा योग्य तो मोबदला त्यांच्या कडून मिळत नसेल तिथे पैसा खर्च करणं मला पटत नाही... तुमचा काय अनुभव आहे??

4 comments:

Deepak Parulekar said...

माझा आनुभव अजुन तरी चांगला आहे !! कमवायला लागल्यापसुन ब्रॅन्ड्स प्रेफरंस मीही देतो ! पण अजुन पर्यंत फसलो नाही.
एकदा प्रोव्होगचे शुज घेतले होते, एका महिन्यातच उधव्स्त झाले पण दुकानदाराने रिप्लेस करुन दिले. ...

हेरंब said...

मीही पूर्वी ब्रॅन्ड्स बद्दल फार जास्त सजग असायचो आणि ठराविक ब्रॅन्ड्सच वापरायचो.. आता काहीही चालतं :)
पण ली कुपरच्या शूजबद्दल मलाही असाच अनुभव आलाय. त्यांचे शूज जास्त टिकत नाहीत. !

मुक्त कलंदर said...

ब्रँडेड गोष्टी घेताना सांभाळूनच घ्यायला हव्यात. नाही तर फसवणूक व्हायची दाट शक्यता असते. मी आपला कंजूस कवडीमल असल्यासारखा वागतो.

आनंद पत्रे said...

माझाही ब्रॅण्डवर विश्वास आहे आणि मलाही कधी निराश व्हावं लागलं नाही सुदैवाने!!!