गुढीपाडव्यानंतर तिसऱ्या दिवशी आमच्या गावची यात्रा असते. अपत्य प्राप्तीनंतर पहिल्याच वर्षी देवदर्शन करावं लागतं म्हणून यावर्षीच्या यात्रेला ओजसला देवदर्शनाला घेऊन जायचं ठरलं..
ओजसला त्रास होऊ नये म्हणून सरळ तवेरा बुक केली होती. जाण्याच्या आधी सगळ्यांच्या मते असं ठरलं की ओझरच्या गणपतीचे दर्शन करून मगच पुढे जाऊ.
रविवारी सकाळी ११ वाजता निघालो.. दुपारचे जेवण करायचे म्हणून माळशेज घाट संपल्यावर लागणा-या पहिल्याच खाद्य गृहात पोहचलो....तिथला मेनू असा होता ...
मुलांना सजवण्याचे काम सुरु असताना गावातली सगळी मुले जमा झाली होती.. माझे छायाचित्रण सुरु असताना माझ्या चुलत बहीणीने दिलेली ही पोज..

मेनू जरी असा असला तरी जेवण मस्त होतं. आमच्या घरात आम्ही तिघे भाऊच फक्त मांसाहारी त्यामुळे ईतरांसोबत जेवताना वेजच खावं लागतं... वेज पंजाबी डिशेस मागवण्यात आल्या.. आई-वडीलांना त्या खूप आवडल्या ..का नाही आवडणार, घाटी मसाला टाकून झणझणीत बनवल्या होत्या.. त्यावर यथेच्छ ताव मारून आम्ही ओझरच्या रस्त्याला लागलो..
मधेच आराम म्हणून थांबलो तेव्हाची क्षणचित्रे..
खरं तर ओजसचा शि-शू वर्गाचा तास सुरु होता म्हणुन हा आराम..साफसफाई झाल्यावर गाडीने ओझरच्या दिशेने कुच केले..
ओझरला पोहचलो तेव्हा दुपारचे २ वाजले होते..गाडी पार्किंगला लावून आम्ही दर्शनाला गेलो..
ओझरच्या मंदिरात मस्त पैकी गारवा होता...ओजस सोबत गणपतीचे दर्शन घेतले.. पुजारी चांगले होते.. त्यांच्या कृपेने ओजसने देवाचे दर्शन देवाच्या पायाशी डोके टेकून घेतले.. देवदर्शन झाल्यावर तिथेच मंदिराच्या मंडपात थोडा वेळ बसलो.. त्या थंडाव्यामध्ये बसून सगळे फ्रेश झालो आणि त्यामुळे प्रवासातला क्षीण खुपसा कमी झाला..

ओझरमध्ये गणपतीचे दर्शन झाल्यावर आम्ही गावचा रस्ता धरला...गावी पोहचता पोहचता रात्र झाली होती.. पोहचल्या पोहचल्या गाडितले सामान उतरवून पहिलं ओजसच्या खाणपानाची सोय केली..
रात्री मस्त पैकी झुणका भाकर खाऊन अंगणात चांदण्या प्रकाशात कधी झोपी गेलो कळलच नाही.
रात्री मस्त पैकी झुणका भाकर खाऊन अंगणात चांदण्या प्रकाशात कधी झोपी गेलो कळलच नाही.
दुस-या दिवशी सोमवारी गुढीपाडवा होता. लहाणपणी जेव्हा लवकर उन्हाळ्याची सुट्टी असायची तेव्हा गुढीपाडव्याला गावी जायला जमायचं. यावर्षी खूप वर्षाने तो योग जुळून आला होता. सगळ्या गावाने पहाटे पहाटेच घरावर गुढी उभारल्या होत्या ..
माझं गाव घोडेगाव (कोलदरा)... भीमाशंकरला जाताना या गावावरून जावं लागतं...
गुढी उभारून आम्ही सगळे भीमाशंकर आणि डिंभा धरणाजवळ असलेल्या देवतेच्या दर्शनाला निघालो..
डिंभा धरणाला वळसा घालून गाडी धरणाच्या पाण्याच्या बाजूने जात होती.. पाण्याचे साम्राज्य खूप दूरवर दिसून येत होते..आधी देवीचे पडके मंदिर होते .. गावक-यांनी मिळून नवे घरासारखे दिसणारे एक मंदिर बांधले होते.. देवीच्या पायाशी ओजसचे डोके टेकून दर्शन घेतले.. गाडीने पुन्हा धुरळा उडवून भीमाशंकरचा रस्ता पकडला..
भिमाशंकरला तशी फारशी गर्दी नव्हती.. उन्हाळा असल्याने जेमतेम ८०-९० यात्रेकरुच दिसत होते.. म्हटलं बरं झालं.. दर्शनतरी व्यवस्थित होईल.. पण यावेळी ओजस मुड मध्ये नव्हता. डेपो पासुन देवळाकडे जाताना १००-१५० पाय-या उतरून जावे लागते.. आम्ही पाय-या उतरून भिमाशंकरच्या देवळाच्या आत शिरण्याआधी ओजसने भोकाड पसरले.. काहीही केले तर तो ऐकेना.. त्यात कहर म्हणजे आम्ही त्याची दुधाची बाटली गाडीतच विसरलो होतो.. झालं.. पुन्हा त्या पाय-या चढून गाडीतली बॉटल आणे पर्यंत माझी वाट लागली होती..
पोट भरल्यावर मात्र रावसाहेब मस्तपैकी खेळू लागले.. पोटोबा झाल्यावरच आम्ही विठोबा म्हणजेच शिवशंकराचे दर्शन आरामात घेउ शकलो..
भीमाशंकर मध्ये जर मला काही आवडत असेल तर ते भीमाशंकरचा कुंदि पेढे...मला हे इतके प्रिय आहेत की मी माझ्या स्वत:साठी पाव किलो पेढा घेतो आणि बाकीचा पाव किलो इतरांना प्रसाद म्हणून वाटण्यासाठी.. :) दुर्दैवाने त्याचे फोटो काढता नाही आले त्यामुळे क्षमस्व..... :)
भीमाशंकरचे दर्शन करुन झाल्यावर लवकरच निघालॊ कारण गावात एक महत्वाचा सोहळा होणार होता.. जो मी तब्बल १० वर्षानंतर पाहणार होतो..

आमच्या गावी गुढीपाडव्याला विहीर देव निघतो.. म्हणजे गावातल्या लहान मुलांना विहीर देव बनवण्यात येते.. त्यांना पारंपरिक पद्धतिने सजवण्यात येते.. सोबत कावड असते तिलाही सजवतात..या देव बनलेल्या मुलांना मग गावाच्या मंदिरात गोल रिंगण करून नाचायला सांगतात आणि त्यांच्या पायावर सुवासिनी कळशीतले पाणी ओततात.. असे पुर्ण गावात फिरून पाच ठिकाणी हा कार्यक्रम होतो.. या विहीर देवांची मग पुजा केली जाते.. गुळ खोब-याचा प्रसाद करून वाटला जातो.. लहाणपणी मी सुद्धा असेच विहीर देवाचे रुप घेतले होते याची आठवण यावेळी झाली..
मुलांना सजवण्याचे काम सुरु असताना गावातली सगळी मुले जमा झाली होती.. माझे छायाचित्रण सुरु असताना माझ्या चुलत बहीणीने दिलेली ही पोज..
या गाव भेटी दरम्यान ओजसला सांभाळणे हेच मोठे जिकरीचे काम होते. त्याचे शि-शू वर्ग सुरुच होते...
बायको तर सकाळी त्याचे सगळे कपडे घेऊन ओढ्यावर धुवायला जात असे... :)
बायको तर सकाळी त्याचे सगळे कपडे घेऊन ओढ्यावर धुवायला जात असे... :)
अपु-या वेळेअभावी आम्हाला जत्रेआधी निघावे लागले. जत्रेच्या आधी कीर्तन सप्ताहाचा शेवट आणि काल्याचा प्रसाद असतो. ओजसच्या नावे यावर्षी काल्याच्या प्रसादाच्या जेवणात आमचा सहभाग होता. त्यामुळे काल्याचा प्रसाद घेण्यास थांबणे अनिवार्य होते..
काल्याच प्रसाद घेतला आणि गावच्या कुलदेवतेचे दर्शन घेऊन आम्ही परतीचा प्रवास सुरु केला..
काल्याच प्रसाद घेतला आणि गावच्या कुलदेवतेचे दर्शन घेऊन आम्ही परतीचा प्रवास सुरु केला..
11 comments:
लई लई भारी...
ओजसला अनेक अनेक आशीर्वाद... :)
khupach chan
Ojasache vega vegalya rupatil darshan aamhala ya blogvar hoel hi apeksha ;)
मस्त रे आका..... ओजसला अनेक अनेक आशिर्वाद :)
तुझी ही पोस्ट वाचताना मला का कोण जाणे पण अगंबाई अरेच्चा मधलं ’मल्हारवारी’ आठवतं होतं सारखं... तुझ्या लिखाणाचा परिणाम असावा.... :)
@सुहास.. धन्स रे..
@विक्रम.. अरे त्याच्यासाठी एक वेगळं पेज बनवणार आहे लवकरच.. :)
@तन्विताय.. धन्स गं..
अगं कुठे काय ..तरी मोडकं तोडकं जमतं.. त्यात हपिसात बसुन टंकलय जसं सुचेल तसं.. खरच हे सहजच नाही जमतं.. :)
मस्त रे आका. ओजसने पहिल्याच सहलीमध्ये खूप भटकंती केली.
मस्त आनन्द, धनस्
या निमित्ताने तु आम्हाला तुझा गाव फ़िरवून आणलेस. लिखणासोबत फोटू असल्यामुळे आम्हीही आनन्द घेतला
उत्तरोत्तर असे Photo Journalisam येत राहो हीच मनोकामना.
ओजस ला अनेक आशिर्वाद.
वाह!
ओजस भटक्या ग्रुप मध्ये समाविष्ट झाला तर :D
बाकी सहजच म्हणते तसेच... मल्हारवारी.. या गाण्याची खरचं आठवण आली :)
ओजस बाळा.. अजून पुर्ण महाराष्ट्र, ३५० च्यावर किल्ले व अनेक डोंगर दर्या तुझी वाट पाहत आहेत... व्हा तय्य्य्यार !!!!!!!!!!
मस्तच वर्णन केलंय!
ओआका सगळ्यात जास्त आवडला.
गोऽऽडुला आहे...बापावरच गेलाय अगदी. :)
मज्जा आहे बुवा एका मुलाची.. :) फोटो तर एकदम प्रोफेशनली काढल्यासार्खे आले आहेत. आणि पोस्ट पण मस्त. पुढची ट्रिप कधी आणि कुठे??
इतकं सगळं लिहिलं, पण गावाचं नांवच नाही लिहिले कुठे.. असो.. हात लिहिता ठेव.
मस्त रे आका
जाम भटकलाय तुझा बब्बू. कधीतरी त्याला भेटायला येईन म्हणतो..
Post a Comment