Tuesday, June 22, 2010
एक "ध्यान"
तेव्हा मी बदलापूरला एका बिपिओ मध्ये कामाला जात होतो. राज ठाकरेंची अटक झाली तो दिवस. त्याबद्दल हा दिवस माझ्या लक्षात नाही राहीला कारण दुसरेच आहे आणि ते म्हणजे त्या दिवशी भेटलेले एक ध्यान...हो हो तेच सांगणार आहे...
तर सकाळी सकाळी ६ वाजता मला गाडी घेण्यास आली. नवीनच ईंडिका होती. तशी माझी सर्व चालकांशी ओळख, पण आज नवीनच ध्यान दिसतं होतं.
वय २५-२६ च्या दरम्यान, ५"५ फुट उंची, मळकट पट्ट्या पट्ट्यांचा चॉकलेटी टी-शर्ट, केस काळे कुळकुळीत (खुप सारं राईचं तेल चोपलं होतं) आणि त्यावर कहर सकाळी सहा वाजता महाशय काळा गॉगल घालुन चालकाच्या सीट वर बसलेले.
मी दरवाजा उघडुन आत पुढे बसलो. गाडी सुरु झाली पण राज ठाकरेंना अटक झाली म्हणून की काय त्या गाडीनेही ५ मिनिटांतच पुढचा टायर पंक्चर करून बंद पुकारला. ध्यानाने खाली उतरुन गाडी पंक्चर झाल्याचे सांगीतले. त्याला विचारलं आता काय करायच तर तो म्हणाला काही नाही गाडीच्या डिकीत दुसरा टायर आहे बदलु तो. गाडी नवी, नवीनच रुजु झालेली होती. त्याने मागच्या डिकीतुन सामान काढलं तेही नवं. त्या सोबत बोलता बोलता कळलं की ती गाडी एका वकिलाची आहे, २ दिवसा पुर्वीच घेतलेली आणि बिपिओला रुजु झालेली आहे. मला जरा त्याच्याबद्दल शंका आली (लघुशंका नव्हे).
मी: तुम्हें मालुम है टायर कैसे बदलते है ??
ध्यान: हा मालुम है सर. टेंशन मत लो. (तोंडावर स्माईल)
मी: पहले कभी खुद बदला है क्या ??
ध्यान: नही पर मालुम है मुझे.
मी बाहेर उतरुन हा काय करतोय ते पाहू लागलो. त्याने जॉक टाकुन गाडीचा पुढचा भाग उचलला. एक मात्र खरं याच्यामध्ये उत्साह दाबून भरला होता.
टायरचे स्क्रु काढले, मागुन टायर आणला, तो बसवला. पुन्हा स्क्रु लावले आणि ते फीट करु लागला. मला काही ते जमन्यासारखं नव्हतं तरी मीही त्याला मदत करु का विचारलं पण तो काही मागे हटत नव्हता. त्यांचे स्क्रू लावून झाले. मी त्याला पुन्हा कन्फर्म कर म्हणून सांगितलं. त्यानेही पुन्हा कन्फर्म केलं. पण त्याची ही पहिलीच वेळ त्यामुळे मी निश्चिंत नव्हतो.
गाडित बसलॊ आणि गाडी सुरु झाली. मी ज्या बाजुला बसलॊ होतो त्याच बाजुच्या टायर बदलून झाला होता त्यामुळे माझं सारखं लक्ष त्या टायरकडे होतं. मी मध्ये मध्ये हळुच मान थोडी बाहेर काढून पाहत होतो की स्क्रु नीट आहेत का, टायर वाकडा तिकडा तर नाही ना फिरत. त्याला सांगीतलं की बाबा ४० च्या पुढे नेऊ नकोस गाडी. पण तो काही जुमानत नव्हता. कधी गाडी ५५ वर पळत होती कधी ६० वर आणि वरुन हे ध्यान गाड्यांना कट सुद्धा मारत होतं.
मी पुन्हा त्याला सांगीतलं बाबा रे जरा सावकाश चालव, उशीर झाला तरी चालेल. पण तो म्हणे "साब टेंशन मत लॊ, बराबर जायेंगे."
गाडी एकदाची नेरूळच्या चढा जवळ आली आणि मी सुटकेचा निःश्वास सोडला.
ध्यान: देखा साब मैंने बोला था ना पोहच जायंगे बराबर करके.
मी: हा यार.
ध्यान: साब मेरी ड्रायवींग कैसी लगी??
मी: अच्छी है .
ध्यान: मेरी ड्रायविंग देखके आपके कभी ऐसा लगा क्या की मैंने २ दिन पहलेही ड्रायविंगका कोर्स कंम्प्लिट किया है.
माझ्या कपाळात गेल्या.
- तुमचा आनंद
Subscribe to:
Post Comments (Atom)
15 comments:
भन्नाट आहे.
धन्यवाद ताय़..
त्या ध्यानाने ध्यान लावुन काम केले, म्हणुन हा एक नंबर ब्लॉग तुम्ही लिहिला. त्याला ध्यानवाद (धन्यवाद) दिले का?
एक नंबर...
लय भारी !!
जबरा भौ!
लय भारी !!
मस्त! छान जमला आहे!
आनंदी आनंद आहे सर्वच... :)
हे हे मस्त :)
भारीच...
त्याचे पहिले दोन्ही प्रयोग तुझ्यावरच झाले म्हणायचे ..नशीब यशस्वी झाले ते...
जबरी
He..he... Mast aahe post...!!! :)
जब्बरदस्त .............
सहीच रे... गिनीपिग झाले तुझे...
खतरनाक आहे....एकदम ते online संता जोक असतात न तसं काहीस वाटल....
Post a Comment