Thursday, September 10, 2009

पब्लिक लुटालूट

काही महिन्यांपूर्वीची बातमी .. शिवाजी महाराजांचे भव्य शिल्प नरीमन येथे उभारण्यात येणार आहे ...
वाचताच मनात आले.. वा क्या बात है ... म्हणजे मुंबईच आणि महाराजांच नाव या कारणाने जागतिक पातळीवर जाणार ...
पण नंतर खुप विचार केला. 

नक्की सरकार हे शिल्प उभारून काय हासिल करत आहे??
निवडनुक लक्ष्यात घेउन महाराष्ट्रातील जनतेची मने जिंकने?? की सामान्य माणसाच्या पैश्याचा अपव्यय ??
शिवाजी महाराजांची अशी खुप शिल्प आधीचं बहुतेक ठिकाणी उभारण्यात आली आहेत .. त्यात अनखिन भर टाकण्यात काहीच हासिल नहीं..
मुंबई मधे आधीच खुप पर्यटन ठिकाणे आहेत आणि त्यांची परिस्थिति कशी आहे हे सांगणे न लागे आणि त्यात या शिल्पाची जबाबदारी पर्यटन विभागाला देण्यात आली आहे म्हणझे अझुन त्याची  किती वाट लागणार अणि कसा सगळा पैसा कसा वाया जाणार याची कल्पना येते ..
या कामासाठी ३५० करोड मंजूर झाले आहे ..जे काम सुरु झाल्यावर कमी पडणार .. मग अनखिन ३५० करोड़ खर्च करावे लागणार. . अस करता करता याचा खर्च १५०० करोड़ होणार..
म्हणजे जनतेचे १५०० करोड़ (धरून चला) यासाठी वाया जाणार ... महाराजांना सुधा हे खपले नसते ...
अरे या पेक्षा अश्या कितीतरी गोष्टी आहेत जिथे पैसा कमी पडतोय....तिथे का नाही हे वापरत ??
हा पैसा कुठे वापरता येईल ??
आत्महत्या करनार्या गरीब शेतकर्यांसाठी ,
महाराष्ट्रात साक्षरतेचे प्रमाण ७७% आहे .. कितीतरी मुले अझून शाळेत जात नाहीत त्यांच्यासाठी...
राज्यात दुश्काळ सदृश्य अशी भरपूर गावे आहेत त्यांच्यासाठी ...
राज्यात कितीतरी मोठे पोर्जेक्ट निधि अभावी पेंडिंग आहेत  त्यांसाठी .....

याविरुध्ह विशाल दादलानी यांनी http://smallchange.in येथे पेटिशन काम्पैग्न स्टार्ट केले असल्याचे पेपरमधे वाचले आणि काही नाही तरी इथून तरी या सगळ्या विरोधात जमेल तसा विरोध प्रकट करता येईल म्हणुन स्वताहाची साइन केली...

-  टवाळ

2 comments:

सिद्धार्थ said...

३५० करोड म्हणजे खूप मोठा आकडा आहे. महाराष्ट्र अजुन इतकेही सधन नाही की शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी इतकी मोठी किंमत मोजता येईल. हा पैसा शेकडो कामांमध्ये सत्कारणी लागू शकतो. पण हे होणे नाही हेही खरे...

Anonymous said...

हे सरकार टवाळ लोकांचे आहे हे आतापर्यंत सर्वांवा कळलेच आहे. आता पर्यंत काहिच न केल्या मुळे काहितरी करणे भाग आहे, आता हे काहितरीच करायला निघाले, शिवरायांच्या नावाने.
१. या शासनाला महागाई दिसत नाही.
२. यांना वाढलेली गुंडगीरी दिसत नाही.
३. शेतकरी जणु आत्महत्या करायलाच जन्माला येतात.
४. शासनाचे कर्मचारीच नाराज आहेत, त्यामुळे सर्वांना निवडणुकीच्या कामाला लावले.
५. तुरडाळ या शासनाची या निवडणुकीत डाळ शिजू देणार नाही.