आधी पासूनच नवनवीन काहीबाही करणारा मी ..फ़क्त छायाचित्रावर अडकलो असा काही जणांना वाटल असेलच .
बरोबरच आहे म्हणा, गेल्या काही पोस्ट मी फ़क्त माझे वेडे वाकडे आणि कसलेही काढलेले फोटुच फ़क्त अपलोड करत होतो.
मनात आधीच ठरलेल, काहीतरी..मनात येईल ते लिहाव यासाठी बनवलेला हा ब्लॉग..म्हटल चला मग आता थोड लिखाण करुया.
आता लिखाण म्हणजे साधी बात थोडीच आहे. सगळ्या ब्लोगर्सला जो पहिलाच प्रश्न पडतो तोच म्या पामराला ही पडलाच.की सुरूवात कुठून करायची??आणि समोर आली ती आपली लोकल..म्हटल चला लोकलवरच काही लिहू .
आता लोकल म्हणजे काय ते विचारू नका.... मुंबईमध्ये राहिला आणि लोकल नाही माहित तर अश्यांना परप्रान्तियाच्या आधी बाहेर काढून टाकले पाहिजे... (हे लोकलच्या पोटी भावनेच्या भरात लिहले आहे।)
मुंबईची धमनी असे जीला म्हटले जाते अश्या या लोकलने प्रवास करताना खूप गमतीदार प्रसंग घडतात , तुमच्या बाबतीत माहीत नाही पण माझ्या बाबतीत घडतात बुवा म्हणजे मी ते एन्जॉयच करत असतो खरतर..
तर या आपल्या लोकलमध्ये घडलेले काही प्रसंग...
१) वेळ: सकाळ
रोजच्या सारखीच ठाणे फास्ट पकडली.कॉलेज पासून लागलेली लोकलला लटकण्याची सवय, आजही मी बाहेर लटकतच होतो. अशातच लोकल ठाणे आणि मुलुंडच्या मधे आली.
ट्रॅक च्या बाजूला किती छान जाहिराती असतात हे सांगणे न लागे . अशीच एक भिंत जाहिरात वाचली , " बादशाह मसाला, स्वाद और सुगंध की परंपरा " आणि पाहतो तर काय त्या जाहिराती बाजूलाच मुंबईकर आपला सकाळचा विधी उरकत होते. काय योगायोग आहे ना ;-)
२) स्थळ : माणसांनी खाचाखच भरलेली लोकल
तसा हा सुध्दा रोजच्याच सारखा दिवस, पण आज गर्दी जरा जास्तच होती इतकी की मान हलवायला सुध्दा जागा नव्हती. मी लोकलच्या मधल्या भागातच उभा होतो. आज न जाणो कसा पण गर्दीचा थोड त्रास होत होता. माझ्या बाजूला माझा मित्र उभा होता.
मी: आज गर्दीचा त्रास जरा जास्तच होतोय रे
मित्र: मला गर्दीपेक्षा लोकांची पोट खराब असल्याचा त्रास जास्त होतोय
तो पर्यंत माझा रुमाल माझ्याच नाकापर्यंत गेला होता .....
३)स्थिती: पाउस धो धो पडतोय
आता मुंबईत कामाला जाणारा असा एकही नाही जो पावसाळ्यात लोकल मध्ये अडकला नसेल. कधी कधी पाउस असा पडतो की कुणी त्याचा व्हाल बंद करायचा विसरुनच गेलाय की काय..
विद्याविहार-कुर्ला दरम्यान लोकल थांबलेली.मी खिडकीजवळच उभा (रोजच खिडकी सीट मिळत नाही). ४० मिनिटे झाली तरी लोकल काही जागची हालेना. त्यात काही हुशार प्रवासी (अशी माणसे ज्याना लोकल का थांबली आहे याचे बहुदा कारण कळलेले असते असा माझा समझ) तसेच बाहेर उडया टाकून चालत कुर्ल्याला चालले होते.
अश्याच एक हुशार भय्यास मी विचारले " भय्या क्या हुआ? ट्रेन क्यू रूकी है? "
भय्या: "मालूम नाही. कूच लोच्या बो** हो गया है" (याच्या तोंडाला काही हाड) अर्धा डबा हास्यरसात....
5 comments:
Suravat lokal pasun gr8
Pakka Mumbai karanch darshan ghadavalassss... :)
Mast ahae tavalaki
Keep it uppp
Hi Anand
Mast aahet Local Anubhav.....
keep it up
Sahi yaar, agadi mumbaikaranchi nasach sapadali ki tula .........
Mast.. asach chhan chhan lihit raha......
AAni tavalkya kar....me aahech tuzyabarobar .....Kay??
chalel na???????????
chan... uttam prayatna. majya saddichha tula ani tujhya blogsathi.
HI andy
chan aahe tuza praytna!!!
keep it up..
Post a Comment