खरं तर इतरांप्रमाणे मीही या दिवसाची वाट पहातच होतो. वाट पाहण्याचे कारण की ज्यांना अजुन पर्यंतच मी गुगल रीडर मध्ये (ब्लॉगर्सचे RSS फिड) ओळखत होतो त्यांना प्रत्यक्षात भेटता येणार होते. या आधीच याहु आणि गुगल ग्रुपमधल्या सदस्यांच्या भेटीगाठी झाल्या होत्या त्यामुळे अद्न्यात व्यक्तींना भेटण्याबद्दलची भिती वाटत नव्हती.
दादरचं दासावा तर माहित होते त्यामुळे शोधाशोध न करता जागेवर पोहचलो. समोरच देवकाका भेटले आणि आपण बरोबर त्याच मेळाव्याला पोहचलो हे नक्की केलं. माझा बॅच घेतला आणि तिथेच सुहास झेले, रोहन चौधरी आणि सचिन पाटिलशी ओळख झाली. बझकट्ट्यावरील सागर, अमेय, आनंद यांच्याशीही ओळख झाली. हळुहळु ब्लॉगर आणि वाचक मंडळी जमली आणि कांचनतायने मेळाव्याला सुरुवात केली. ब्लॉगर्सने स्टेजवर येउन स्वत: बद्दल आणि ब्लॉगबद्दल सांगायचं होतं. यावेळी वयस्क ब्लॉगर्सनी स्वत: बद्दल जास्त आणि ब्लॉगबद्दल कमी सांगितलं. खुप जण तर मराठी लिखाण आणि कीबोर्ड लेआऊट याबद्दलच जास्त बोलले. माझ्या मनात जे होत ते निरजाने मेळाव्यातल्या चर्चेबाबत तिच्या ब्लॉगवर लिहिले आहेच.
मी तसा स्टेजबद्दल भित्राच पण आयोजकांच स्टेजवर जाउन आभार मानावं आणि थोडंस ब्लोगबद्दल बोलावं म्हणुन स्टेजवर गेलो खरा पण समोर बघुन जे बोलायच होतं तेच विसरलो.
कसंतरी स्वत:बद्दल आणि ब्लोगबद्द्ल वायफळ बोललो आणि खाली उतरलो.
मागे गेल्यावर सचिन विचारतो कसा "कसं वाटलं ??"
मी "फाटणे हा काय प्रकार आहे ते तिथे गेल्यावर समजतं" तो काय ते समजला..
( स्टेजवर विसरलो ईथे पुन्हा विसरायला नको बाबा : आयोजकांचं हा मेळावा आयोजित केल्याबद्दल मनापासून आभार )
एक बरं होतं की मेळाव्यात ब्लॉगर्स स्वत: ओळख करुन असल्याने त्यांची व्यवस्थित ओळख होत होती. मला तर मध्ये मध्ये आश्चर्याचे धक्के बसत होते. चुरापाव ब्लॉग लिहिणारा कुणी लहान वयाचा असेल असे वाटलेच नव्हते. शब्दांचे जंजाळ टाकणारा "आल्हादचं प्रतिबिंब" या ब्लॉगचा आल्हाद तोही तसाच ;-).. त्याला कसं झेपत इतकं क्लिष्ट लिहायला देव (काका?) जाणे . ज्या ब्लॉगर्सना त्यांच्या ब्लॉगवर जाऊन प्रतिसाद देता येत नव्हता त्यांना प्रत्यक्ष भेटून मनापासून शुभेच्छा देता आल्या. त्यातल्या त्यात राजा शिवाजी (http://www.rajashivaji.com/) संकेतस्थळाचे सर्वेसर्वा मिलिंद वर्लेकर सुद्धा आले होते. त्यांना भेटल्यावर तर दुधात साखर पडल्यासारखे झाले होते. काय बोलू आणि काय नाही... त्यांनी त्यांच्या कार्याची आणि सध्या पर्यंतची त्या संकेतस्थळाची काय प्रगती झाली आहे याबद्दल सांगितले. खादाडी सुद्धा मस्त झाली हॊती ...शेवटी छायाचित्रणाचा कार्यक्रम पार पडुन आम्ही बाहेर पडलो.
रोहन आणि बाकिचे दुसरीकडेच खादाडी करणार असल्याने आम्ही (अमेय, सागर, सचिन, विशुभाऊ, भारत आणि मी) पणशीकरांकडे जायचे ठरवले. पण पणशीकर गावी गेले असावे बहुतेक.
मग आम्ही मोर्चा तांबे आरोग्य भुवनकडे वळवला; पण तेही अर्धे शटर टाकुन बसले होते. शेवटी कामतांकडे मेंदू वडा आणि लस्सीवर आम्ही खादाडी आवरती घेतली आणि परतीच्या वाटेला लागलो ..
पुन्हा लक्षात आलंय म्हणुन: या सोहळ्याच्या खर्चाची जबाबदारी उचलणाऱ्या अद्न्यात प्रायोजकाचेही मनापासुन आभार...
पुणेरी पाटी: हापिसामधलं काम आटपून ही पोस्ट लिहीली आहे त्यामुळे उशिर झालाय, तसंच जशी जमली आहे तशी गोड मानून घ्या उगीच चुका काढत बसु नका
-तुमचा आनंद
8 comments:
झक्क झालीय पोस्ट आनंदराव!
तुमच्या सगळ्यांच्या पोष्टींतूनच मी सोहळा अनुभवला!
मस्त आका... मजा आली तुला आणि सर्वांना भेटून.
वाचता येत नाही रंगबदल आवश्यक.
मजा आली यार आपको मिलके...
Chaan zaliye post....!!!
सही आनंद!! देर आए दुरुस्त आए :)
जमलं तर रंगसंगती बदलता आली तर बघ. वाचताना खूप त्रास होतो.
मस्त, कालच झाला सोहळा बघ एकदम :)
हो, हेरंब म्हणतोय तस थीम अपडेट कर, खूप तीव्र रंगसंगती आहे...
प्रतिसादाबद्दल धन्यवाद
विभी: अरे पुढच्या वेळी विसरू नकोस यायला
आप, सागर: सगळ्यानाच मजा आली असणार बघ..
साधक,हेरंब, सुहास: रंगसंगतीमध्ये योग्य तो बदल केला आहे,
मैथिली : धन्यवाद, मागे मुलांमधेच वेळ जास्त गेला त्यामुळे तुला भेटता नाही आले व्यवस्थित.
Post a Comment