आमचे लहान बंधुराज एका सॉफ्टवेर कंपनी मधे ऍप्लिकेशन सप्पोर्ट विभागात आहे.
दोन महिन्या पूर्वी त्याचा कंपनीने त्यांच्या घोळक्यातल्या दोघांना प्रशिक्शणासाठी चेन्नईला पाठवायचे ठरवले आणि त्या मधे आमच्या बंधूराजांची वर्णी लागली. एक दोन आठवडयात निघायच म्हणता म्हणता तब्बल एक महिन्याने जायचे ठरले. या पूर्ण महिन्यात त्याची जाण्याची तयारी सुरूच होती; त्याची म्हणजे आमचीच म्हणा. तिकडची माहिती काढणे जसे की खाण्याची सोय कशी आहे, कुठे रहाणार, काय काय घेउन जायचे, टिकिट काढले का ? या बाबत सगळ्यान्चा विचार सुरु झाला.
पहिल्यांदाच कुणी घरा बाहेर इतक्या लांब (आमच्या हिशोबाने चेन्नई लांबच आहे म्हणा ) जाणार म्हणुन विशेष काळजी घेतली जात होती. आईने टिपिकल विचार करून (म्हणजे प्रत्येकाची आई जसा विचार करते तसाच) दिवाळिला बनवण्यात येणारा चिवडा, नानकटाइ ई. बनावुन ठेवले. "तिथ काय काय खावे लागेल. फक्त इडली आणि डोस्याने पोट नाही भरत. त्यापेक्षा हे बर." इति आई .
जास्तीचे कपडे घेउन झाले, सामानाची आवारा आवर झाली आणि अस करता करता एकदाचा तो दिवस आला आणि आमचे बंधुराज दादरला ट्रेन पकडण्यासाठी निघाले. आम्हाला कुणाला सुट्टी नाही मिळाली म्हणुन, ओफ्फिस मधून सुटुनही चेन्नईची ट्रेन पकड़ता येत नाही हे पाहून आणि तसा तो हुशार आहे म्हणुन, तो आणि त्याचा मित्र दोघेच दादर स्टेशनसाठी रवाना झाले. इकडे आम्ही सगळे घरी पोहचलो आणि तो दादरला ट्रेनमधे बसल्याचे कळवले. म्हटल चला ट्रेन व्यवस्थित मिळाली त्याला.
आम्ही हात पाय धुवून जेवायलाच बसलो होतो, तर याचा फ़ोन "मी ट्रेनने ठाण्याला पोहचलो आहे". आईला बोलायच होत म्हणुन मोबाइल तिच्याकडे दिला.
'हे खाऊ नकोस ते खाऊ नकोस, अस कर तस करू नकोस. याची काळजी घे. असे उपदेश देता देता तिच्या डोळ्यात पाणी आल. आम्ही तिची मस्करी करत हसू लागलो.
"काय आई . तो मोठा झालाय त्याला कळत सगळ ." मी.
" पहिल्यांदा इतक्या लांब चाललाय. कसा राहिल काय माहित. आईच काळिज असत तर कळल असत." अस म्हणता म्हणता ती रडू लागली आणि आम्ही हसायचेच थांबलो.
" अग एका महिन्यात येईल परत. काय काळजी करतेस?" अस मी म्हणालो खरा पण दोन मिनिटात त्याच्या आठवणी, त्याचा बालिशपणा, त्याच सगळ्यान्शि मस्करी करन आठवल आणि मलाही गहिवरून आल.
जवळची माणस दूर जातात तेव्हाच त्यांची आठवण जास्त येते याचा त्यादिवशी प्रत्यय आला.
चेन्नईला पोहचल्यापासून पठ्या दररोज दोन वेळा फोन करतोय आणि सद्या कंपनीच बिल वाढवतोय
1 comment:
javalchi manase jevdhi door jatat,
tevdhi athavninchya dware jast javal yetat! ekadam patale.
Post a Comment